‘तुम्ही आम्ही पालक’
या मासिकाची वार्षिक वर्गणी ७३०/-, कुरिअरने हवे असल्यास अधिक २००/- डिलीव्हरी चार्जेस असून यात दिवाळी जोड अंकासहीत वर्षभरात एकूण ११ अंक असतील.


हा संकल्प आहे,

तो केवळ शाब्दिक नसून त्यासाठीची दिशा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ती आपण जाणून घेतल्यावर आपल्याला या वेगळ्या प्रवासाचे मोल तर कळेलच पण आपणही या प्रवासात आनंदाने सहभागी व्हाल, याची आम्हाला खात्री आहे. ‘तुम्ही आम्ही पालक’ मासिकाची आम्ही ११ उद्दिष्टे निश्चित केली आहेत. ती अशी:
१. शासनाने आणि सर्व समाजाने महाराष्ट्रात पालक दिन साजरा करण्यास सुरवात करावी.
२. महाराष्ट्रातील पालकांत जाणीव जागृतता होण्यासाठी प्रत्येक गावात ‘तुम्ही आम्ही पालक’चा अंक पोचविणे.
३. शाळा महाविद्यालयांतील फी वाढीवर नियंत्रण ठेवणे.
४. स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांनी आनंदाने सामोरे जावे, असे वातावरण निर्माण करणे.
५. शिक्षण हक्क कायदा प्रभावी करणे.
६. शिक्षणातील पालकांचा सहभाग वाढविणे.
७. पालक – पाल्य सुसंवादासाठी पोषक वातावरण तयार करणे.
८. पालक प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.
९. पालक – शिक्षक संघ प्रभावी करणे.
१०. बालसंगोपनाची जाणीव जागृती निर्माण करणे.
११. कौटुंबिक नातेसंबंध वृद्धींगत करणे.
Tumhi Aamhi Palak Magazine

Rs. 140.00
+ Rs. 10.00
Convenience Charges

addtocart-button

Rs. 700.00
+ Rs. 30.00
Convenience Charges

addtocart-button

Rs. 1300.00
+ Rs. 45.00
Convenience Charges

addtocart-button

Rs. 1800.00
+ Rs. 57.00
Convenience Charges

addtocart-button

Rs. 2400.00
+ Rs. 75.00
Convenience Charges

addtocart-button

Rs. 3000.00
+ Rs. 93.00
Convenience Charges

addtocart-button

Rs. 350.00 /-

addtocart-button
केवळ उद्दिष्टच नव्हे तर ती कशी साध्य करायची, याचे नियोजनही आम्ही केले आहे. पालकत्व आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले सर्व प्रकारचे शिक्षण याचा सर्वव्यापी विचार या नियोजनात करण्यात आला आहे. पालकत्व म्हणजे घरात आईवडील, शाळेत शिक्षक, घराबाहेर समाज जे संस्कार करतात ते. मानवी जीवनातील पालकत्व हे असे व्यापक आहे. या पालकत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि समाजाला या भूमिकेचे महत्व पटविण्यासाठी समाजासमोर पालकत्वाचा आदर्श घालवून देणाऱ्या दाम्पत्यास याच वर्षीपासून ‘महापालक’ हा सन्मानही देण्याचे आम्ही ठरविले आहे. असा हा पहिला महापालक सन्मान ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आणि मंदाताई यांना प्रदान करण्याचे भाग्य आम्हास आम्हास लाभले आहे.